१. महानगरपालिकेच्या संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in यावर जलतरण तलाव नोंदणी या लिंक वर क्लिक करणे.
२. पोहणाऱ्या नागरिकाने अथवा पाल्याने अथवा पालकांनी आपले नोंद खाते तयार करणे ही प्रक्रिया एकदाच करावी लागेल.
३. नोंद केल्यानंतर आपण लॉग इन करावे व आपला इच्छित जलतरण तलाव निवडून तारीख व वेळ निश्चित करुन पोहणाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त तीन लोकांची नोंद आपण करू शकता,पोहणाऱ्या नागरिकाचा आधार नंबर या ठिकाणी नोंद करावा लागेल.
४. यानंतर आपण निवडलेल्या पोहणाऱ्या यांच्या संख्येनुसार प्रत्येकी वीस रुपये या दराने ऑनलाइन पेमेंट करणे.
५. पेमेंट केल्यानंतर तो सीरियल नंबर हा आपण लक्षात ठेवून आपण निवडलेल्या जलतरण तलावावर प्रवेशाच्या वेळेस हा नंबर संबंधित कर्मचाऱ्याला सांगून आपली नोंद प्रमाणित करणे.
६. जलतरण तलाव सरावासाठी Online पद्धतीने बॅचचे आरक्षण करणे केल्यानंतर जलतरण तलावावर येताना कोणत्याही ID Proof ची झेरॉक्स प्रत आणणे बंधनकारक आहे.